खंडाळा | सातारा- पुणे दरम्यान खंबाटकी घाटात सर्यफूल गोडेतेल घेवून जाणारा ट्रक पलटी झालेला आहे. सदरचा अपघात गुरूवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास झालेला असून यामध्ये दोनजण जखमी झालेले आहेत. ट्रक पलटी झाल्याने लाखो लिटर गोडेतेल रस्त्यावर सांडल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
घटनास्थळारून मिळालेली माहिती अशी, चिपळूण येथून पुण्याकडे सुर्यफूल गोडेतेल घेवून ट्रक क्रमांक (केए01-ए- 4514) निघालेला होता. सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास खंबाटकी बोगद्यातून पहिला टर्नवरती वळण घेत असताना ट्रक पलटी झाला आहे. या ठिकाणावर ट्रक पलटी झाल्यानंतर ट्रकमधील शेकडो तेलाच्या पिशव्या अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या. अनेक पिशव्या फुटलेल्या असल्याने गोडेतेल रस्त्यांवर सांडलेले होते.
गोडेतेल रस्त्यांवर सांडल्याने अनेक वाहने घसरून पडत होती. खंडाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून रस्ता धुवून काढला आहे. या घटनेत ट्रकवरील चालक व क्लिनर किरकोळ जखमी झालेले आहेत. घटनास्थळी पोलिस हवालदार अशोक जाधव, पोनाईक ए. आर. कुंभार, श्री. यादव यांनी वाहतूक व्यवस्थित केलेली आहे.