ज्यांच्यात हिंमत असेल त्यांनी नाव बदलूनच दाखवावे; इम्तियाज जलीलांचे चॅलेंज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या एक नवा वादसुरु झाला आहे तो म्हणजे औरंगाबाद शहराचा उल्लेख औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर असा करण्यात आल्याचा होय. या नामांतराच्या मुद्यावरून राज्य सरकारवर भाजप नेत्यांकडून टीका केली जाऊ लागली आहे. नुकतेच एमआयएम पक्षाचे नेते तथा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी याबाबत चॅलेंज दिले आहे. “ज्यांच्यात हिंमत असेल त्यांनी शहराचे नाव बदलून दाखवावे, असे त्यांनी म्हंटले आहे.

खासदार इम्तियाज जलील यांनी आज माध्यमांशी संवाद सडला. यावेळी ते म्हणाले की, औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा सध्या उपस्थित झाला आहे. मागील कित्येक वर्षांपासून मोठा वाद आहे. शिवसेना तसेच भाजपसारखे हिंदुत्ववादी पक्ष औरंगाबाद शहराचा संभाजीनगर असा उल्लेख करतात. तर काँग्रेससारख्या पक्षाने औरंगाबाद शहराचे नाव बदलण्याला विरोध केलेला आहे. फक्त शहराचे नाव बदलण्यापेक्षा पायाभूत सुविधांचा विकास व्हावा, अशी भूमिका काँग्रेससारख्या पक्षांनी घेतलेली आहे.

नुकतेच एका सरकारी परिपत्रकात औरंगाबाद शहराचा उल्लेख थेट संभाजीनगर असा करण्यात आला आहे. या प्रकरणात ज्या अधिकाऱ्यांचा हात आहे. ज्या अधिकाऱ्यांनी हे परिपत्रक काढले आहे. त्याने तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही देखील जलील यांनी यावेळी केली आहे.