हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल Credit Card वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. बँकांकडूनही यासाठी अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत. क्रेडिट कार्ड वापरण्याचे अनेक फायदे देखील आहेत. हे जाणून घ्या कि, क्रेडिट कार्डद्वारे खर्च केलेल्या पैशांवर 30-45 दिवसांसाठी बँकांकडून व्याज आकारले जात नाही. त्याच प्रमाणे क्रेडिट कार्डच्या पेमेंटवर ग्राहकांना अनेक ऑफर्स आणि रिवॉर्ड पॉईंट्स देखील मिळतात.
मात्र Credit Card वापरण्याचे जसे फायदे आहेत तसेच त्याचे तोटे देखील आहेत. कारण बँक क्रेडिट कार्ड सर्व्हिस वापरण्यावर गुप्तपणे लादले जाणारे शुल्क किंवा अटींबाबत फारसा उल्लेख करत नाहीत. क्रेडिट कार्डचे असेच एक वैशिष्ट्य म्हणजे ‘मिनिमम ड्यू’. ही सर्व्हिस चांगली वाटत असली तरी याद्वारे ग्राहकांच्या खिशाला जबरदस्त कात्री मारली जाते.
‘मिनिमम ड्यू’ ही किमान थकबाकीची रक्कम आहे, ज्याची रक्कम न भरल्यास बँकेकडून व्याजासहीत दंड आकारला जाऊ शकतो. मिनिमम ड्यू हा आपण खर्च केलेल्या एकूण रकमेच्या फक्त 4-5 टक्के असतो. मात्र किमान देय रक्कम भरून, आपण मोठ्या रकमेच्या ओझ्यापासून वाचत असला तरीही याला फायद्याचे म्हणता येणार नाही.
कारण मिनिमम ड्यू भरल्यास उर्वरित रकमेवर बँकांकडून भरपूर व्याज आकारले जाते. तसेच आपल्या थकबाकीची परतफेड करण्यास जितका उशीर होईल, तितके यावरील व्याज देखील वाढेल.यामध्ये आपल्याला वार्षिक 30-40 टक्के दराने व्याज द्यावे लागू शकेल.
तसेच जर आपण सारखा मिनिमम ड्यू भरला तर पुन्हा Credit Card ने खरेदी करण्यावर आपल्याला व्याजमुक्त कालावधीचा फ़ांद्या मिळणार नाही. अशा परिस्थितीत आपल्या खरेदीच्या दिवसापासून व्याज सुरू होईल.
हे ध्यानात घ्या कि, मिनिमम ड्यू भरून कर्जाची रक्कम मात्र आहे तशीच राहते. तसेच यामुळे आपण भविष्यात संपूर्ण रक्कम जरी भरली तरीही त्याचा आपली CIBIL रिपोर्टवर परिणाम होतो. जे सतत मिनिमम ड्यू भरतात त्यांच्याबाबत बँकेचा असा विश्वास आहे की, त्यांच्याकडे लिक्विडीटीचा अभाव आहे.
मिनिमम ड्यू भरल्याने Credit Card च्या लिमिटवरही नकारात्मक परिणाम होतो. सतत कमी रक्कम भरल्याने, जितकी कमी रक्कम दिली जाते, तितकेच क्रेडिट लिमिटही कमी होते. असे सतत केल्याने, बँका आपल्याकडून 5% ऐवजी 10% मिनिमम ड्यू शुल्क आकारू शकतात, कारण मिनिमम ड्यू हे आपल्या मुख्य कर्जावर अवलंबून असते.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bajajfinserv.in/credit-card
हे पण वाचा :
व्हॉट्सअॅपला टक्कर देण्यासाठी Telegram ने लाँच केले खास फीचर्स !!!
‘या’ Valentine’s Day Sale अंतर्गत iPhone 14 वर 30000 रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी !!!
Pension Scheme : ‘या’ योजनेमध्ये गुंतवणूक करून वृद्धांना मिळेल 70 हजार रुपयांची पेन्शन, अशा प्रकारे घ्या फायदा
Motorola Moto E13 : 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेला हा जबरदस्त फोन भारतीय बाजारपेठेत दाखल, असे असतील फीचर्स
New Business Idea : दरमहा लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवण्यासाठी सुरू करा ‘हा’ व्यवसाय, सरकारकडूनही मिळेल मदत