वर्धा । प्रहार पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी उपमुख्यमंत्रीपद अपक्षाला पण दिल पाहिजे, अशी मागणी केली आहे. सगळे पाठिंबा देणारे पक्ष जर उपमुख्यमंत्रीपद मागत असतील तर अपक्षाला का देऊ नये, असा सवाल राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला हे. सोबतच अपक्षाला ही उपमुख्यमंत्री पद देत एक मुख्यमंत्री आणि ३ उपमुख्यमंत्री करावं आणि एक वाढवत ४ उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री अस ५ होईल, असं गणित मंत्री कडू यांनी मांडलं आहे. ते वर्धा येथे स्थानिक विश्रामगृहात पत्रकारांशी बोलत होते.
काँग्रेसचे नेते नाना पाटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पटोलेंच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नाराज असल्याचे दिसत आहे. विरोधी पक्षाला सत्ता पालटण्याची स्वप्न पडत आहेत तर महाविकास आघाडीतील काँग्रेस उपमुख्यमंत्री पदासाठी आटापिटा करत आहे. त्यातच आता काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री पदावर दावा केला आहे. ठाकरेंच्या या दाव्यावर बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्रीपद अपक्षाला दिलं जावं अशी मागणी केली आहे.
दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पटोलेंच्या राजीनाम्यानंतर शिडी शिवाय फासे पलटवू, असं वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा कडू यांनी चांगलाच समाचार घेतला. फडणवीसांना असं म्हटल्याशिवाय जमणार नाही. त्यांच्या कडील आमदारांची महाविकास आघाडीकडे येण्यासाठी रांग लागली आहे. त्यांना त्या आमदारांना पक्षात ठेवायचं आहे. “जाऊ नका बाबा आपलं सरकार येत असं त्यांना हे बोलत राहावं लागतं. फडणवीसांच ते वक्तव्य आमच्या साठी नाही ते त्यांच्यासाठी आहे.त्यांचे आमदार फुटू नये म्हणून असल्याचं बच्चू कडू म्हणाले.
बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.