अमरावती प्रतिनिधी | आपल्या हटके स्टाईलने चर्चेत राहणारे बच्चू कडू नेहमीच आपल्या कार्यामुळे प्रकाशझोतात येतात. सातत्याने आगळ्या वेगळ्या आंदोलनातून चर्चेत राहणारे बच्चू कडू यांची ओळख रुग्णसेवक म्हणूनही आहे. नुकतेच एका रक्तबंबाळ झालेल्या अपघातग्रस्ताला पाहून बच्चू कडू यांनी आपल्या गाड्यांचा ताफा थांबवला. एवढेच नाही तर स्वताच्या गाडीत त्या अपघात ग्रस्तांना आणून रुग्णालयात दाखलही केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून कडू यांचे यामुळे कौतुक होत आहे.
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर ते अकोट मार्गावर आराळा-बोराळा फाट्याजवळ दोन दुचाकीच्या धडकेत भीषण अपघात झाला. या अपघातात एक महिला आणि दोन पुरुष जबर जखमी झाले. याच दरम्यान राज्यमंत्री बच्चू कडू हे कामानिमित्त अकोला येथे जात असताना त्यांना हा अपघात झाल्याचं दिसलं. त्यांनी आपल्या वाहनाचा ताफा थांबवून, अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून गेले.
राज्यमंत्री बच्चू कडू हे एवढ्यावर थांबले नाही, तर त्यांनी स्वतःच्या वाहनात त्या अपघातग्रस्तांना आणून दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर बच्चू कडू हे पून्हा अकोल्याच्या दिशेने रवाना झाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’