मंत्री जयंत पाटील यांच्याकडून तिसरीतील श्रेयाचे कौतुक; व्हायरल हस्ताक्षराची घेतली दखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महराष्ट्र ऑनलाईन : सध्याच्या काळात सोशलमिडियामुळे कोणतीही दर्जेदार कलाकृती व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. एखादा व्हिडीओ, फोटो किंवा इतर कलाकृती नेटकऱ्यांना आवडल्यास नेटकरी ते आवर्जून शेअर करतात. नगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कडूवस्ती येथे इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या श्रेयाचे सुंदर हस्ताक्षर सोशलमिडीयावर चांगलेच व्हायरल झाले. अनेकांचा श्रेयाच्या या सुंदर अक्षरावर विश्वास बसला नाही. त्यामुळे श्रेया लिहीत असणारा व्हिडीओही व्हायरल झाला. नेटकऱ्यांनी श्रेयाच्या या सुंदर हस्ताक्षराचे मनापासून कौतुक केले.

आता मंत्री जयंत पाटील यांनी देखील श्रेयाच्या या सुंदर हस्ताक्षराची दखल घेतली असून तिचे याबद्दल कौतुक केले आहे. जयंत पाटील म्हणतात, प्रिय श्रेया, तुझे खूप खूप अभिनंदन! तुझे हस्ताक्षर स्पर्धेतील लिखाण सोशल मीडियावर पाहिले आणि तुझे खुप कौतुक वाटले. तुझे वळणदार आणि सुंदर असे हे हस्ताक्षर जरूर जप. तुझ्या भावी शैक्षणिक कारकिर्दीला माझ्या शुभेच्छा!

 

या आधीही चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा वडिलांवरील हृदयद्रावक निबंध असाच व्हायरल झाला होता. त्याचे वडील वारले होते. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी त्या व्हायरल निबंधाची तातडीने दखल घेऊन संबंधित कुटुंबाला मदत केली होती.

 

Leave a Comment