भारत हा तरुणांचा देश, 18 ते 25 वयोगटातील तरुणांना कोरोना लस द्यावी ; आव्हाडांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आणि राज्यात कोरोना विषाणूने अक्षरशः विस्फोट केला आहे. राज्यात दररोज 50 हजाराच्या आसपास कोरोना रुग्णसंख्या आढळून येत असून जनतेसाठी चिंतेची बाब आहे. दरम्यान राज्यात लसीकरण देखील मोठ्या प्रमाणात चालू असून सध्या ४५ आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्वांना करोना लस देण्याची परवानगी देण्यात आली आहे. यादरम्यान 18 ते 25 वयोगटातील तरुणांना कोरोना लस द्यावी अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली.

जितेंद्र आव्हाड यांनी यांनी याबाबत ट्विट केले की, जगभरात भारत हा तरुणांचा देश आहे अशी आपली ओळख आहे. या कोरोना संक्रमण काळात कोरोनाची लागण तरुणांना जास्त होताना दिसतेय. त्यामुळे 18 ते 35 वयोगटातील तरुणांना ताबडतोब लसीकरणाची व्यवस्था करावी ही नम्र विनंती.

दरम्यान यापूर्वी आव्हाडांनी राज्यातील पत्रकारांना लस देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली होतु. राज्यातील जेवढे पत्रकार आहेत जे संकटाला सामोरे जाऊन आपल्याला माहिती देत असतात, समाजाला जागृत ठेवत असतात. त्यांना लस देणे जरुरीचे आहे. त्यांची ही मागणी आपण ताबडतोब मान्य करावी अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली होती.

राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता राज्य सरकारने वीकेंड लॉकडाऊनची घोषणा केली आहे. शुक्रवारी रात्री 8 पासून सोमवारी सकाळी7 पर्यंत हा लॉकडाऊन असेल तसेच दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment