हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा आणि पश्चिम महाराष्ट्रातील हजारो प्रवासी पुणे-मुंबईला प्रवास करत असतात. मात्र, मुंबईकडे जाताना या प्रवाशांना पुणे आणि पनवेलमध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडी व ट्रॅफिकच्या समस्येमुळे जवळपास 2 तास प्रवास उशिरा प्रवाशांचा होतो. परिणामी आता यावर उपाययोजना म्हणून एक नवीन ग्रीन फील्ड महामार्ग तयार केला जावा,अशी मागणी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली होती. या दोघांनीही याबाबत सकारात्मकता दाखविली आली. याबाबत लवकरच मंत्री गडकरी मोठा निर्णय घेतील. याबाबत निर्णय घेतल्यास सातारा ते मुंबई दरम्यानच्या प्रवासात 2 तासांची बचत होणार आहे.
मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे फलटण- सुरूर- वाई- महाडवरून मुंबई- गोवा महामार्गमार्गे मुंबई जेएनपीटी असा ग्रीन फिल्ड हायवे या पर्यायी मार्गाचा आराखडा सादर करण्यात आलेला आहे. पश्चिम महाराष्ट्र व कोकणाला जोडणारा हा मार्ग असल्याने उद्योग- व्यवसाय व नैसर्गिक, धार्मिक पर्यटनाला अधिक गती मिळणार आहे. हा महामार्ग साताऱ्यातील उद्योग, कृषी, शैक्षणिक क्षेत्रासाठी फायदेशीर ठरणार असून यामुळे आध्यात्मिक पर्यटनाला चालना मिळणार असल्याचा दावा केला जात आहे.
फलटण, सातारा, कोरेगाव, वाई आदी भागांतील लोकांनी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पर्यायी मार्गाची मागणी केली होती. त्यांच्या मागणीनंतर आता प्रत्यक्ष या मार्गाचा आराखडाही तयार करण्यात आला असून तो मंत्री गडकरी यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. जर फलटण- वाठार स्टेशन- सुरूर- वाई- धोम धरणमार्गे- ढवळे- महाड- दिघी पोर्ट- जेएनपीटी, मुंबई असा ग्रीन फील्ड महामार्ग तयार झाला तर सातारा जिल्ह्यातून तसेच पश्चिम महाराष्ट्रातून मुंबईला प्रवास करणे सोयीचे होईल.
ग्रीन फील्ड महामार्ग जोडणार 8 रस्ते
1) आळंदी- पंढरपूर पालखी मार्ग फलटण येथे जोडणारा, 2) बारामती – शंकेश्वर, 3) पुणे – बंगळूरला पर्यायी मार्ग, 4) नवीन रेवास – रेड्डी कोस्टल मार्ग, 5) मुंबई – गोवा महामार्ग, 6) अलिबाग – विरार, 7) मुंबई- चिर्ले हा ट्रान्स हर्बल लिंक, 8) महाड- पेन मार्ग