सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
अजित पवारांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि पत्रकारांच्यात जोरदार खडाजंगी झाली. पारनेरचे आमदार निलेश लंके याच्या कामाची पध्दत अत्यंत चांगली आहे. तर सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीचे कामाचा आढावा घ्यावा, अशी मागणी पत्रकारांनी केल्याने वाद झाला.
सातारा जिल्ह्यात एक, दोन लोकप्रतिनधी सोडले तर कोणीही काम केले नसल्याचे पत्रकारांनी सांगितले, यावर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, प्रत्येकाचा पॅटर्न वेगळा असतो. आम्ही काय केले ते केले आहे. माझ्या मतदार संघात जावून काम पहा. सातारा सोडा आणि मतदार संघात जावा. जिल्ह्यातील आमदरांनी काय केले विचारता. आम्ही काम केले आहे म्हणून सांगत आहे.
अखेर अजित पवार आणि वाई मतदार संघाचे आ. मकरंद पाटील यांनी या विषयावर पडदा पाडला. यावेळी पत्रकारांनी जिल्ह्यातील लोकांसाठी आम्ही बोलत आहोत. कोणत्याही लोकप्रतिनिधीचे नांव घेतलेले नाही, जिल्ह्याची अवस्था सुधारली पाहिजे असे पत्रकारांनी सांगितले.