डिपॉझिट जप्त झालेल्यांनी विधानसभेच्या गप्पा मारू नये : शंभूराज देसाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
हर्षद कदम हे शिवसेनेच्या तिकिटावर लढुन जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत चौथ्या क्रमांकावर गेले होते. त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते त्यांनी आता विधानसभेच्या गप्पा मारू नये, असा टोला उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी लगावला आहे. ते कराड येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.

कराड येथील पत्रकार परिषदेवेळी मंत्री देसाई म्हणाले की, हर्षद कदम हे शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभेच्या गप्पा मारणारे आहेत. ज्यावेळी जिल्हा परिषदेची निवडणूक हाळी होती. त्यावेळी निवडणुकीत हर्षद कदम हे शिवसेनेचे तिकीट आणि धनुष्यबाण चिन्ह वापरले होते. चिन्ह व तिकीट असताना देखील तब्बल चौथ्या क्रमांकावर ते गेले होते शिवाय त्यांचे डिपॉझिटही जप्त झाले होते.

ज्यांना जिल्हा परिषद निवडणूक व्यवस्थित जिंकता येत नाही. त्यामध्ये विजय मिळवता येत नाही अशा लोकांनी विधानसभेच्या गप्पा मारू नये, असा टोला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी लगावला.