हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पाटण तालुक्यातील कोयनानगर येथे गेल्या काही दिवसांपासून पुनर्वसनाच्या मागणीसाठी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली कोयना प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरु आहे. राज्य सरकारने दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा आंदोलकांनी दिल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांना फोन करून आंदोलनस्थळी भेट देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज मंत्री शंभूराज देसाई आंदोलकांची भेट घेणार आहेत.
मंत्री शंभूराज देसाई यांनी डॉ. पाटणकर यांच्याशी 22 मार्च रोजी फोनद्वारे संपर्क साधला होता. यावेळी मंत्री देसाई यांनी प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी अधिवेशन संपल्यानंतर तात्काळ उच्चस्तरीय समन्वय समितीची बैठक घेऊन योग्य तोडगा काढण्यात येईलमी असे सांगितले. यावर डॉ. पाटणकरांनी आंदोलनस्थळी भेट देऊन चर्चा करावी तसेच नुसती चर्चा करून उपयोग नाह तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक घेऊन तोडगा काढावा, असे सांगितले.
मंत्री शंभूराज देसाईंचा डॉ. पाटणकरांना फोन; कोयना प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाबाबत म्हणाले…
त्यानुसार मंत्री शंभुराज देसाई आज जिल्हा दौ-यावर येत असून कोयनानगर येथे ठिय्या आंदोलन स्थळी भेट देणार आहेत. तसेच विविध अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कोयना धरण पुर्नवसनाच्या बाबत शासकीय विश्रामगृहात बैठक घेण्यात येणार आहे.