हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते आणि राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत हे सुद्धा आज गुवाहाटी ला रवाना झाले असल्याची माहिती समोर येत आहे. आधीच तब्बल 40 हुन अधिक आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले असून आता मंत्री उदय सामंत हे सुद्धा गुवाहाटी ला गेल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गोटात सामील होणारे उदय सामंत हे आठवे मंत्री आहेत. सामंत यांच्या पुर्वी दादा भुसे, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, बच्चू कडू, शंभूराज देसाई यांनी शिंदेगटात प्रवेश केला आहे. आता आदित्य ठाकरे हे एकमेव शिवसेनेचे मंत्री बाकी आहेत.
दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला हायजॅक केलं आहे. त्यामुळे काँग्रेस- राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपसोबत सत्ता स्थापन करावी अशी मागणी शिंदे गटाची आहे. दोन तृतीयांश पेक्ष्या जास्त आमदार एकनाथ शिंदे यांच्या कडे आहेत त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यात अनेक राजकीय घडामोडी पहायला मिळू शकतात.