आता शत्रूंची खैर नाही! 26 राफेल लढाऊ विमाने, 4 स्कॉर्पिन पाणबुड्या खरेदी करण्यास सरकारची मंजूरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ ते १४ फ्रान्स दौऱ्यावर जाणार होते. परंतु त्यापूर्वीच आयएनएस विक्रांतसाठी २६ राफेल लढाऊ विमाने, २२ राफेल एमएस आणि ४ स्कॉर्पिन पाणबुड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावाला भारतीय संरक्षण मंत्रालयाने मंजूरी दिली आहे. त्यामुळे आता भारतीय जवान शत्रूंना सामोरे जाण्यासाठी अधिक सज्ज होणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फ्रान्सच्या बॅस्टिल डे परेडसाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. यासाठी मोदी सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भारत हा आयएनएस विक्रांत या विमानवाहू जहाजासाठी विमाने खरेदी करण्याचा विचार करीत होता. त्यानुसार आता संरक्षण अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ४ स्कॉर्पिन पाणबुड्या, २२ राफेल एमएस, २६ राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाली आहे. याबाबतची माहिती एएआय या वृत्त संस्थेने दिली आहे. याचा भारताला खूप मोठा फायदा होणार आहे.

दरम्यान फ्रान्समध्ये फ्रान्सचा इतिहास आणि लष्करी ताकद दाखवण्याचा कार्यक्रम आयोगित करण्यात आला आहे. भारतासाठी फ्रान्स हे दीर्घकाळापासून महत्वाचा संरक्षण भागीदार आहे. त्यामुळे आताच्या दौऱ्यामध्ये भारत आणि फ्रान्समध्ये संरक्षणाच्या दृष्टीने अनेक करार होणार असल्याचे म्हटले जात आहे. दुसरीकडे लढाऊ विमानांच्या खरेदीला मंजूरी मिळाल्यामुळे डिफेन्स स्टॉक तेजीत आले आहेत. या मंजूरीमुळेे भारतीय शेेअर बाजारात देखील गती पाहिला मिळत आहेे. कारण की, संरक्षण कराराची बातमी येताच, कोचीन शिपयार्डड कंपनी शेअर्समध्ये १० टक्क्यांनी अधिक वाढ झाल्याचे दिसून आले आहे.