बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाणामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने जीवाचे बरेवाईट करून घेईल अशी धमकी देत १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले आहेत. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडीत मुलगी व मुलगा हे दोघेही बुलडाणा शहरातीलच आहे.
सध्या हा अल्पवयीन आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. यासंदर्भात पीडीत अल्पवयीन मुलीने बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात २१ जुलै रोजी तक्रार दाखल केली आहे. त्या आधारावर या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या १७ वर्षीय आरोपीने पीडित मुलीशी जवळीक साधली होती.
यानंतर त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्तापीत करण्यासाठी आपण आपल्या जिवाचे बरेवाईट करून घेऊ असे म्हणत मुलीला ब्लॅकमेल केले. यानंतर जानेवारी २०२१ ते ७ जुलै २०२१ दरम्यान तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्तापीत केले होते. यानंतर या मुलीने आरोपीच्या जाचाला कंटाळून २१ जुलै रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला.




