शेजारच्या तरुणाकडून वारंवार छेडछाड; छेडछाडीला कंटाळून 14 वर्षीय मुलीची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीड जिल्ह्यातील पाटोदा याठिकाणी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये एका उच्चशिक्षित अभियंत्यानं गावातील 14 वर्षीय मुलीची सतत छेड काढल्यामुळे पीडित मुलीनं आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. याप्रकरणी मृत मुलीच्या नातेवाईकांनी संबंधित तरुणाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

अटक केलेल्या 30 वर्षीय आरोपी तरुणाचं नाव उमेश अश्रुबा क्षीरसागर असं आहे. तो पाटोदा तालुक्यातील चुंभळी येथील रहिवासी आहे. उच्चशिक्षित अभियंता असणारा हा तरुण सध्या कंत्राटदार म्हणून काम करतो. असं असूनही आरोपी उमेश हा मागील बऱ्याच दिवसांपासून गावातील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढत होता. आरोपीनं अनेकदा मृत मुलीची आणि तिच्या बहिणीची छेड काढली होती.

गुरुवारी मृत मुलीचे आई वडील नातेवाईकाच्या लग्नासाठी बाहेरगावी गेले असल्याचा फायदा घेऊन आरोपी उमेशनं संबंधित 14 वर्षीय पीडित मुलगी आणि तिच्या लहान बहिणीची पुन्हा छेड काढली. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेनं टोकाचं पाऊल उचलत आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात छेडछाड करण्यासोबतचं आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Comment