मुंबई । कोरोना व्हायरस आणि लॉकडाउन अशा दुहेरी संकटात हातावर पोट भरणाऱ्या समाजातील एका मोठ्या वर्गापुढे जगण्याचं मोठं संकट आहे. एकीकडे हाताला काम नाही तर दुसरीकडं काही जणांकडे सरकारी मदत घेण्यासाठी शासन दफ्तरी नोंद नाही. अशा वेळी गरिबांवर उपासमारीची वेळ आली असतांना राज्य सरकारकडून आता रेशन कार्ड नसणाऱ्यांनाही अन्नधान्याचा पुरवठा केला जाणार आहे. कोणत्याही प्रकारचं रेशन कार्ड नसलेल्यांना राज्यात मोफत ५ किलो तांदूळ वाटण्यात येणार आहेत अशी घोषणा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली.
अन्नधान्य पुरवठ्यासाठी कोणी अर्ज केला आहे, कोणाचा अर्ज प्रलंबित आहे किंवा असे केसरी कार्डधारक ज्यांना तांदूळही मिळत नव्हते अशा सर्वांची तहसीलदार पातळीवर यादी तयार करण्यात येणार आहे, अशी घोषणाही छगन भुजबळ यांनी केली आहे केंद्र सरकारच्या आदेशाप्रमाणे आता ही सुविधा राज्यातही उपलब्ध झाली असून नागरिकांनी याबाबत प्रशासनाची संपर्क केल्यास ते मिळू शकणार असून, आता सर्व पीडित लोकांना लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात ही सुविधा उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांनाही काहीतरी अन्नधान्य पुरवठा द्या अशी जी विनंती केंद्र सरकारला आपण केली होती, त्या धर्तीवर आता जिल्हाधिकाऱ्यांकडे अशा लोकांना देण्याचे आदेश आले आहेत, असं भुजबळ म्हणाले. ट्विट करतही त्यांनी याबाबतची माहिती दिली.
आज मंत्रालय,मुंबई येथे विभागाची आढावा बैठक पार पडली या बैठकीत माहे मे व जून महिन्याच्या अन्नधान्य वितरणाचा आढावा,रेशनकार्ड नसलेल्या गरीबांसाठी धान्य वितरण करण्याबाबत केंद्र शासनाच्या योजनेची अंमलबजावणी करणे,स्वस्त धान्य दुकानांसाठी विमा कवच,हमाल व वाहतूक कंत्राटदार यांना pic.twitter.com/UJaqU5yLR7
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) May 19, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”