सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
नवी दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन मरकझ प्रकरण ताजे असताना मिरजेतील मटण मार्केट येथे बरकत मशिदीमध्ये सामुहीक नमाज पठण सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी आणि लॉकडाऊन असताना या मशिदीमध्ये सामुहीक नमाज पठण करणाऱ्या ४१ जणांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये माजीनगरसेवक साजिद पठाण याच्यासह एका बिहारी मौलवीचा समावेश आहे. दरम्यान सामुहीक नमाज पठणासाठी व्हॅटस्ऍपवरुन मॅसेज देऊन बोलाविले असल्याचे सांगण्यात आले. सदर मशिला पोलिसांनी सील केले आहे.
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन जाहीर करण्यात आली आहे. मंदिर, मशिदींमध्ये होणारे धार्मिक विधीही बंद करण्यात आले आहेत.दोनच दिवसांपूर्वी नवीदिल्ली येथे हजरत निजामुद्दीन दर्ग्यात मरकझ या धार्मिक कार्यक्रमानिमित्त हजारो मुस्लिम एकत्र आले होते. मरकझमध्ये सामील झालेले मुस्लिम देशातील विविध राज्यात विस्तारले असल्याने शासनासमोर कोरोना संसर्ग वाढण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने गर्दी टाळण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. कोणत्याही धार्मिक विधी, कार्यक्रमासाठी कोणत्याही समाजाने एकत्र येऊ नये, कार्यक्रम रद्द करावेत, अशा सुचना प्रशासनाने दिल्या आहेत.
असे असताना शुक्रवारी शहरातील मटण मार्केटजवळ बरकत मशिदींमध्ये ४० हून अधिक मुस्लिम एकत्र येऊन नमाजपठण करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत तेथे नमाज पठणाऱ्या मुस्लिमांना ताब्यात घेतले. या नमाज पठणासाठी माजी नगरसेवक साजिद पठाणसह एक बिहारी मौलवीही सहभागी झाला होता. यावेळी 30-35 जणांनी पळून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना पकडले. यापैकी 15 जणांची प्रमुख मार्गारुन धिंड काढण्यात आली. शासनाच्या आदेशाची पायमल्ली करुन नागरिकांच्या जीवीतास धाका निर्माण करणारे कृत्य केल्याबद्दल पोलिसांनी ४१ जणांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे मुस्लिम समाजात खळबळ उडाली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’
हे पण वाचा –
तबलिगी प्रकरण, मुस्लिमांना दोष आणि कायद्याचं खरं रुप – फैझान मुस्तफा
‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ??
कोविड -१९ च्या लसीची उंदीरांवर यशस्वी चाचणी; जाणून घ्या
लॉकडाउन उठवण्यापेक्षा केंद्र सरकार घेऊ शकते ‘हा’ निर्णय
६ CRPF जवानांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह
करोनामुळे मृत्यू झाल्यास पोलिसांच्या कुटुंबियांना ५० लाख देणार- अजित पवार