Wednesday, October 5, 2022

Buy now

पोर होत नाही म्हणून मिर्ची बाबाकडे गेली महिला, बेशुद्धावस्थेत मिर्ची बाबाचा महिलेवर बलात्कार

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशमधील भोपाळमध्ये एका बाबाला (mirchi baba) बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे काँग्रेस सरकारच्या काळात या बाबाला (mirchi baba) राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती. या बाबाला (mirchi baba) आता बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
भोपाळमधील एका महिलेनं मध्यप्रदेशातील मिर्ची बाबा (mirchi baba) याच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी तक्रारही दाखल करण्यात आली होती. पीडितेनं दिलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून मिर्ची बाबाला अटक केली आहे. मूल होत नाही म्हणून ही महिला आपली अडचण घेऊन वैराग्यानंद गिरी म्हणजेच मिर्ची बाबा (mirchi baba) याला भेटली होती. यानंतर या बाबाने त्या महिलेला आपल्या जवळ बोलवलं होतं आणि प्रसाद म्हणून दिलेल्या एका भस्मातून महिलेला बेशुद्ध केलं आणि तिच्यावर रेप केला. या प्रकरणी या बाबाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर कलम 376, 506 आणि 342 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीमध्ये या मिर्ची बाबाच्या गैरकृत्याला विरोध केला होता, असं म्हटलंय. तेव्हा वैराग्यनंद गिरी उर्फ मिर्ची बाबाने (mirchi baba) या महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. महिलेने वैराग्यनंद यांच्या भीतीने आणि समाजात बदनामी होईल या दबावाखाली पोलिसात तक्रार दाखल केली नव्हती. यानंतर पीडित महिलेने अखेर हिंमत करून पोलीस स्थानक गाठलं आणि घडलेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास एफआयआर दाखल केला. त्यानंतर या बाबावर (mirchi baba) तातडीने कारवाई करत त्याला ग्वालिअरमधून अटक करण्यात आली.

हे पण वाचा :
“देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, मला माहिती होतं”, अमृता फडणवीस यांचे मोठे विधान

आमदार शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाला दुसरा धक्का, ‘या’ चुकीमुळे पाकिस्तानला झाला फायदा

खरे खंडणी बहाद्दर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे : आ. महेश शिंदे

नांदेडमध्ये खंडणीप्रकरणी काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाला अटक, तर शिवसेनेचा माजी नगरसेवक फरार