फलटणच्या मॅग फिनसर्व्हकडून ग्राहकाचे सोन्याचे दागिने गहाळ : पाटण पोलिसात तक्रार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

फलटण तालुक्यातील मॅग फिनसर्व्ह या कंपनीने फसवणूक केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पाटण शाखेत ठेवलेले सोन्याचे दागिने गहाण ठेवल्यानंतर ते कंपनीने गहाळ केले आहेत. त्यामुळे कंपनीचे मालक अनंता मोहोटकर यांचेवर पाटण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद फत्तेसिंह पाटणकर यांनी दिलेली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पाटण येथील फत्तेसिंह पाटणकर यांनी मॅग फिनसर्व्ह कंपनी येथून 9 ऑगस्ट 2016 रोजी 60 हजार रुपये सोने तारण कर्ज घेतले होते. त्या करीता 32.460 ग्रॅम वजनाचे सोन्याचा राणीहार व 12.130 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण तारण ठेवले होते. त्यानंतर सन 2019 साली घरखर्चासाठी पैशाची आवश्कता असल्याने फत्तेसिंह पाटणकर यांनी मॅग फिनसर्व्ह कंपनी शाखा पाटण येथून 1 लाख 3 हजार 894 रुपये सोने तारण कर्ज घेतले होते. त्याकरीता 32. 460 ग्रॅम वजनाचे सोन्याचा राणीहार व 12.130 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण 15 टक्के व्याजावर तारण ठेवले होते. फिर्यादी पाटणकर यांना कंपनीच्या मुख्य शाखा असलेल्या फलटण कार्यालयातून दि. 30/7/2020 पत्र पाठविले होते. त्यामध्ये कर्जाची थकबाकी झाली आहे. तरी तुम्ही नोटीस मिळाले पासुन 10 दिवसाचे आत खाते बंद अगर नुतनीकरण करून घ्यावे असे सांगतिले होते. ऑगस्ट 2020 मध्ये नमुद कंपनीच्या कराड शाखेत जावून चौकशी केली. त्यावेळी त्यांनी मला फलटण शाखेत जावून कर्जाची रक्कम भरण्यास सांगितले.

फिर्यादीने ऑगस्ट 2021 मध्ये कंपनीच्या सांगणेप्रमाणे कर्ज व व्याज मिळुन 1 लाख 57 हजार रुपये रक्कम घेवुन सोन्याचे दागिने सोडविण्याकरीता फलटणला गेले होते. तेव्हा तारण म्हणून दिलेले सोन्याचे दागिणे कंपनीजवळ नव्हते. तेव्हा फिर्यादीने माझे सोन्याचे दागिणे द्या व तुमची रक्कम घ्या म्हणाले. परंतु कंपनीकडे सोन्याचे दागिणे नसल्याने त्यांनी पैसे घेतले नाहीत. त्यावेळी कंपनीचे मालक अनंता गणपत मोहोटकर व व्यवस्थापक विनायक सुळ त्यांचेकडे चौकशी केली असता. अनता मोहोटकर यांनी तुमचे सोन्याचे दागिणे (राणीहार व गंठण) गहाळ झाले आहेत. त्याऐवजी आम्ही तुम्हाला तेवढ्याच वजनाचे दुसरे दागिणे बनवुन देतो. तुम्ही आमच्या कंपनीची थकीत कर्ज रक्कम 1 लाख 57 हजार रुपये भरा.

फिर्यादीने मला दागिने तारण म्हणुन दिले होते तेच दागिने मला परत दया व तुमची थकीत कर्ज रक्कम घ्या. तेव्हा त्यांनी दागिने दिले नाहीत ते गहाळ झाल्याचे सांगितले. त्यानंतर सप्टेंबर 2021 मध्ये कंपनीचे मालक अनंता गणपत मोहोटकर यांचेशी संपर्क साधून दागिन्याबाबत विचारणा केली. तेव्हा त्यांनी कर्जाची रक्कम भरा दागिने दुसरे देतो. मात्र, फिर्यादीने तेच दागिने पाहिजे सांगितल्याने मालक अनंता मोहोटकर यांनी फोन घेणे बंद केले. त्यामुळे पाटण पोलिसात तक्रार दिल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. या नुसार सातारा जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेने तपास करून याप्रकरणी सदरची मँग फिनसर्व्ह कंपनी वर भा.द.वि. नुसार कलम ४०२, ४०६, ४२० अंतर्गत कंपनीचे अनंत मोहाटकर यांचेवर पाटण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Comment