औरंगाबाद | भावसिंगपुरा भागांतून एक युवती बेपता झाल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली. भावाने ती अल्पवयीन असल्याची फिर्याद दिल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. मात्र शाळेतील नोंदीमध्ये ती सज्ञान आढळली. छावणी पोलीस तिचा शोध घेत असून युवती बाबत काही माहिती असल्यास पोलिसांना काळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बेपत्ता युवतीचे ऐश्वर्या विनायक कसबे (रा.साठेचौक, भावसिंग पुरा) असे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहीती अशी, ऐश्वर्या ही शुक्रवारी संध्याकाळी दुकानात जाते म्हणून घराबाहेर पडली होती. मात्र ती परत घरी आली नाही. बराच उशीर झाल्याने मित्र मैत्रिणी, नातेवाईकांकडे घरच्यांनी तिची विचारपूस केली, मात्र ती मिळून आली नाही. शेवटी ऐश्वर्याचा भाऊ विठ्ठल कसबे याने छावणी पोलीस ठाणे गाठत 15 वर्षीय अल्पवयीन बहीण ऐश्वर्या बेपत्ता असल्याची फिर्याद पोलिसात दिली. अल्पवयीन असल्याने कायदानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. मुलीच्या वयाबाबत संशय आल्याने पोलिसांनी शाळेत जाऊन तपास केला असता, शाळेत असलेल्या नोंदीनुसार तिचे वय- 20 वर्ष निघाले. या प्रकरणाचा पुढील तपास साह्ययक पोलीस उप निरीक्षक सुरेश जिरे करीत आहेत.
ऐश्वर्या ही घरातून दुकानात जाताना तिने चॉकलेटी रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला होता. रंग गोरा, सडपातळ बांधा अशा वर्णनाची युवती आढळल्यास पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन छावणी पोलिसांनी केले आहे.
चुकीच्या माहितीने पोलिसांना मनःस्ताप
काही वेळा पुरेशा माहितीच्या अभावामुळे किंवा हेतूपुरस्कार फिर्यादी पोलिसांना चुकीची माहिती देत असतात. त्या माहितीच्या आधारे ठाणे अंमलदार गुन्हा दाखल करीत असतात. अशावेळी अनेक प्रकरणात वरिष्ठ अधिकारी ते तपास अधिकारी सर्वांचीच धावपळ होत असते. तपासअंती माहिती खोटी ठरते व हातावरील काम सोडून पोलिसांना मानस्तपला सामोरे जावे लागत आहे. अशी अनेक प्रकरणे गेल्या काळात शहरात समोर आलेली आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा