विहीरीत पडलेल्या चार गव्यांना वाचविण्यात यश, एका गव्यांचा मृत्यू

पाटण तालुक्यातील धावडे गावाजवळील घटना

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पाटण तालुक्यातील मोरगिरी जवळ असणाऱ्या धावडे गावाच्या पाण्याच्या शोधार्थ आलेले पाच गवे कठड्यावरून विहिरीत पडल्याची घटना शनिवारी रात्री घडली होती. सदरील गवे विहीरीतून बाहेर काढण्यासाठी वनविभाग तसेच ग्रामस्थांना मोठे प्रयत्न करावे लागले. जेसीबी सहाय्याने चार गाव्यांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र एका गव्याचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे.

पाटण तालुक्यातील मोरगिरी जवळ पाण्याच्या शोधात असलेले पाच गावे एका विहिरीत कोसळले होते. धावडे या गावात बाळासो कोंडीबा सावंत यांच्या मालकीच्या विहीरीत गवे पडले होते. गवे पडल्याची घटना सात ते साडेसातच्या सुमारास घडली असावी, वन विभागाने सांगितले. गवे विहीरीत पडल्याचे समजताच पाटणचे वनक्षेत्रपाल व अन्य वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.

गव्यांना विहिरीतून बाहेर काढण्यासाठी जेसीबी व क्रेन याचे साहाय्य घेण्यात आले. गवे मोठे असल्याने तसेच जेसीबीने काढताना अडचण होत होती. त्यामुळे विहिरीचे कठडे एकाबाजूने फोडण्यात आले. कठडे फोडल्याने एका बाजूने पाणी बाहेर पडले तसेच गव्यांनाही बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळाल. विहीरीचे फोडलेल्या काठड्यांच्या बाजूने चार गावे बाहेर पडण्यात यशस्वी झाले. त्यामध्ये दोन माद्या व दोन पिल्लांचा समावेश आहे. परंतु एका गव्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like