प्रेमाची मिठी मारायची आहे? मग द्या…8 हजार रुपये; ‘या’ महिलेचा अजब व्यवसाय

0
301
hug with love
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या दुनियेत कोण कसा पैसा कमवेल याचा काही नेम नाही. कारण एका स्त्रीची सध्या अशीच चर्चा आहे जी लोकांना ‘प्रेमाची मिठी’ मारते आणि तेही पैसे घेऊन. हि महिला अशा प्रकारे प्रेमाची मिठी मारते कि तिच्या मिठीत गेल्यावर संबंधित व्यक्ती आपला सर्व ताण विसरू जातो.

प्रेमाची मिठी मारणाऱ्या या महिलेचं नाव आहे मिसी रॉबिंसन. ती सध्या ऑस्ट्रेलियात राहत असून ती लोकांना मिठी मारते आणि त्यांचे सांत्वन करते. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, ती एकटेपणा आणि व्यथित झालेल्या लोकांना मिठी मारून त्यांचे दु:ख ऐकते आणि अशा प्रकारे त्यांचा तणाव दूर करण्यास मदत करते. तिने कडलिंगसाठी खास सेशन्स आणि वेळा सुद्धा ठरवून ठेवलेल्या आहेत.

मिस्सी या कामाच्या बदल्यात लोकांकडून पैसेही आकारते. ती एका सत्रात सुमारे 8 हजार रुपये घेते. हे काम करण्याची कल्पना तिला एक टीव्ही शो पाहिल्यानंतर सुचली, ज्यामध्ये प्रोफेशनल कडलर्स लोकांना ‘प्रेमाची मिठी’ देताना दाखवण्यात आले. मिस्सी तिच्या कार्याला ‘समाजसेवा’ मानते कारण ती मानसिक समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांना तणावातून बाहेर पडण्यास मदत करते