हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mithbav Tambaldeg Beach) बऱ्याचदा रोजची दगदग आणि कंटाळवाणं शेड्युल सोडून कुठेतरी दूर फिरायला जावं असं वाटतं. निवांतपणे स्वतःसोबतचं एकांत एन्जॉय करावा वाटतं. मनाला स्पर्शून जाईल असा निसर्ग आणि आसपास केवळ आणि केवळ शांतता ही कल्पनाच किती सुखद आणि आल्हाददायी आहे. हो ना? तुम्हीही अशा एखाद्या ठिकाणाच्या शोधात असावा तर कोकणातील या समुद्रकिनाऱ्याविषयी जाणून घ्या आणि एकदा नक्की भेट द्या.
कोकणाला भव्य असा सुंदर समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्यामुळे या भागात विविध समुद्रकिनारे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. याध्ये एक असा समुद्रकिनारा आहे जिथली शांतता तुम्हाला मानसिक आराम देऊ शकते. आपण ज्या समुद्रकिनाऱ्याविषयी बोलतोय तो समुद्रकिनारा म्हणजे ‘मिठबाव- तांबळडेग’ (Mithbav Tambaldeg Beach). फॉरेनपेक्षाही अतिशय भारी आणि पर्यटनासाठी उत्तम असा हा समुद्रकिनारा आहे. जिथे अनेक चित्रपटांचे देखील शूटिंग करण्यात आले आहे. चला तर या समुद्रकिनाऱ्याविषयी अधिक माहिती घेऊया.
कुठे आहे? (Mithbav Tambaldeg Beach)
कोकणातील देवगडपासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर ‘मिठबाव- तांबळडेग’ समुद्रकिनारा आहे. हा समुद्रकिनारा अत्यंत सुंदर आणि आकर्षक आहे. मऊ आणि चमकणारी वाळू तसेच निळाशार समुद्र या किनाऱ्याची जमेची बाजू. मिठबाव- तांबळडेग हा देवगड तालुक्यातील अतिशय शांत म्हणून ओळखला जाणारा समुद्र किनारा आहे. (Mithbav Tambaldeg Beach) जिथे क्षितिजाचे विस्तारित लँडस्केप पाहून कोणीही या सौंदर्याच्या प्रेमात पडेल. येथील आंब्याची झाडे, लाटांची खळखळ आणि दूरवर टेकलेल्या आभाळाचे नैसर्गिक सौंदर्य खरोखरच नेत्रदीपक आहे. त्यामुळे अनेक पर्यटक या ठिकाणी आवर्जून येत असतात. मुंबई, पुणे इतकेच नव्हे तर परदेशातूनही लोक हा समुद्र किनारा पहायला आणि त्याचे सौंदर्य न्याहाळायला येतात.
गजबा देवी मंदिर
या समुद्रकिनाऱ्यावर अनेक पर्यटक येत असले तरीही इथे माणसांची वर्दळ फार कमीच दिसून येते. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावरील बराचसा भाग हा शांत आणि सौम्य असतो. इथे मिटबावमधील एका छोट्या टेकडीच्या माथ्यावर तांबलडेग समुद्रकिनाऱ्यासमोर जाणारे ‘गजबा देवीचे मंदिर’ येथील एक लोकप्रिय ठिकाण आहे. (Mithbav Tambaldeg Beach) तसेच शिरगावला उगम पावणारी ‘अन्नपूर्णा नदी’ ही अनेक लहान मोठ्या गावांची तहान भागवत मिठबाव गावातून वाहत जाऊन पुढे तांबळडेग समुद्रकिनाऱ्यावर अरबी समुद्राला येऊन मिळते. त्यामुळे समुद्राच्या सौंदर्यात आणखीच विशेष भर पडते.
कसे जाल?
मित्रांनो, मिठबावपासून सुमारे १७७ किलोमीटर अंतरावर एक विमानतळ आहे. शिवाय येथून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन कणकवली आहे. जे मिटबावपासून ५५ किलोमीटर अंतरावर आहे. तसेच २० किलोमीटर अंतरावर बस टर्मिनस असून इथे सर्व प्रमुख शहरातील राज्य आणि खाजगी बसेसची सेवा पुरवली जाते.
(Mithbav Tambaldeg Beach) दरम्यान, तुम्ही पुण्याहून मिठबावकडे जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला ३७० किमी आणि मुंबईपासून मिठबावपर्यंत जायचे असेल तर ४५० किमी इतके अंतर कापावे लागते. कोल्हापूर गगनबावडा मार्गे या ठिकाणी जाता येते. आतापर्यंत या सुंदर समुद्रकिनाऱ्यावर अनेक चित्रपट तसेच सिरीज आणि मालिकांचे शूटिंग झाले आहे. आजही अनेक दिग्दर्शक मंडळी मिठबाव समुद्रकिनाऱ्यावर शूटिंग करण्याला पहिली पसंती देतात.