Viral Photos : निर्लज्जपणाचा कळस!! विमानात कपलने सोडली लाज; सहप्रवाशांसमोर सीटवर झोपले अन्…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Photos) सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामधील बऱ्याच व्हिडीओंना नेटकऱ्यांची पसंती मिळते. तर बऱ्याच व्हिडिओंवर नेटकरी आगपाखड करताना दिसतात. आताही सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल होतोय. जो पाहून नेटकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. प्रवासादरम्यान कपल्सने गाणी म्हणणे, डान्स करणे, भांडण होणे इथपर्यंत ठीक होत. पण सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोतील कपलचे कृत्य पाहून भल्याभल्यांची सटकली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो (Viral Photos) एका विमानातील आहे. ज्यामध्ये एक कपल अश्लील चाळे करताना दिसून आलं आहे. त्याचे कृत्य पाहून आजूबाजूला बसलेल्या प्रवाशांना लाज वाटत आहे. या विमानातून प्रवास करताना हे कपल थेट सीटवर एकमेकांसोबत झोपून अश्लील चाळे करताना दिसत आहे. विचारापलीकडील त्यांची ही कृती पाहून अनेकांना धक्का लागला आहे. हे कपल असे चाळे करतेवेळी आपण विमानात आहोत आणि आपल्या आजूबाजूला लोक आहेत हे पूर्णपणे विसरून गेले आहेत.

सीटवर झोपले आणि.. (Viral Photos)

विमानात झोपलेलं हे कपल बेडरूममध्ये असल्यासारखं वागताना दिसत आहे. व्हायरल फोटोत दिसतंय की, हे कपल दोन्ही सीटवर एकमेकांना मिठी मारून झोपलं आहे. एकमेकांच्या अंगावर पाय टाकले आहेत आणि अशाप्रकारे झोपून त्यांचे अश्लील चाळे सुरू आहेत. (Viral Photos) एका वृत्तानुसार, विमानातील काही प्रवाशांनी सांगितले ‘पूर्ण ४ तासांच्या विमान प्रवासात या कपलचे असेच अश्लील चाळे सुरू होते. जे पाहून विमानातल्या सहप्रवाशांनासुद्धा अवघडल्यासारखं होत होतं’. यामुळे न केवळ सहप्रवाशांनी तर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी देखील या कृत्याबाबत संताप व्यक्त केला आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

या कपलचे काही फोटो सोशल मीडिया X वर FLEA नावाच्या हँडलवर शेअर करण्यात आले आहेत. सोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘माझ्या विमानात घडलेल्या या दृश्यावर विश्वास बसत नाहीये. संपूर्ण ४ तासांची फ्लाइट अशीच होती’. या फोटोंवर एका युजरने म्हटलंय, ‘फ्लाईट अटेंडंट काही कसे बोलला नाही???’ अन्य एकाने म्हटलं, ‘लाज कशी वाटत नाही?’ (Viral Photos)