मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचे विश्वासू आमदार अनिल बाबर यांचे निधन

Anil Babar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे (Eknath Shinde) विश्वासू आणि सांगली जिल्ह्यातील खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर (Anil Babar) यांचे आज वयाच्या 74 व्या वर्षी आकस्मिक निधन झाले आहे. मंगळवारी अनिल बाबर यांना न्यूमोनिया झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्याने राजकिय वर्तुळात मोठा धक्का बसला आहे.

शिंदे गटाचे अनिल बाबर हे निष्ठावान नेते होते. 7 जानेवारी 1950 अनिल बाबर यांचा जन्म झाला. वयाच्या 22 व्या वर्षी म्हणजेच 1972 साली त्यांनी राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले. जिल्हा परिषद सदस्य ते आमदार असा बाबर यांचा प्रवास राहिला आहे. अनिल बाबर यांनी राजकारण पाहत असताना साखर कारखाने आणि जिल्हा बँकेची जबाबदारी पाहिली. त्यामुळे त्यांनी जनतेच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते.

दरम्यान, शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर अनिल बाबर बाबरी यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी महाविकास आघाडीवर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडताना त्यामागे अनिल बाबर यांची खंबीर साथ होती. त्यामुळे अनिल बाबर सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते. इतकेच नव्हे तर, आमदार अपात्र प्रकरणाच्या यादीत अनिल बाबर यांचे नाव सर्वात प्रथम होते.