Wednesday, February 1, 2023

आ. जयकुमार गोरेंना पुन्हा पुण्याला हलविले

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
माण- खटावचे आमदार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांना दोन दिवसापूर्वी हाॅस्पीटलमधून घरी सोडण्यात आले होते. परंतु गेल्या दोन दिवसात दगदग झाल्याने आ. जयकुमार गोरे यांच्या छातीतील वेदना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. त्यामुळे रुबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार श्री. गोरे यांना शुक्रवारी रात्री पुन्हा पुण्याला हलवण्यात आले.

फलटण- पंढरपूर मार्गावर मलठण येथे 14 दिवसांपूर्वी भीषण अपघातात आ. गोरे जखमी झाले होते. त्यांच्या पाय व छातीच्या बरगड्यांना इजा झाली होती. रुबी हॉल क्लिनिकमध्ये बारा दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. गुरुवारी त्यांना हेलिकॅप्टरने बोराटवाडी येथील असे निवासस्थानी आणण्यात आले होते. मात्र, प्रवास व खूप दगदग झाल्याने त्यांच्या छातीत पुन्हा तीव्र वेदना होवू लागल्या.

- Advertisement -

रुबी हॉल क्लिनिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्थानिक डॉक्टरांनी आ. गोरेंवर उपचार केले. त्यांना पुढील उपचारासाठी रात्री उशीरा पुण्याला हलवण्यात आले. दोन दिवसात आ. गोरेंना पुरेशी विश्रांती मिळाली नाही. त्यांच्या छाती आणि पायाला वेदना होवू लागल्या आहेत. तरी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काळजी करु नये आवाहन सौ. सोनिया गोरे यांनी केले आहे.