Tuesday, February 7, 2023

“आज मैं मूड बना लिया…”; अमृता फडणवीसांचं नवं पंजाबी गाणं रिलीज

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमी काहींना काही कारणांनी चर्चेत येतात. सध्या त्या त्यांनी गायलेल्या आणि नाचलेल्या गाण्यामुळे चर्चेत आल्या आहेत. आजपर्यंत अमृता यांनी अनेक गाण्यांना आपला आवाज दिला आहे. नुकतीच त्यांनी सोशल मीडियावर एक नवे पोस्टर शेअर करीत नव्या “आज मैं मूड बना लिया…” या गाण्याच्या रिलीज डेटची घोषणा केली होती. त्यानंतर आता त्यांचे नवे गाणे रिलीज झाले असून “आज मैं मूड बना लिया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे” या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे.

अमृता फडणवीस यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर गाणे शेअर केले आहे. यामध्ये त्यांनी पंजाबी पेहरावही केला आहे. “आज मैं मूड बणा लेया ए ए ए ,तेरे नाल ही नचणा वे !!’ या गाण्यावर त्यांनी चांगलेच ठुमके लगावले आहेत.

- Advertisement -

आपलया वेस्टर्न ड्रेसमधलया लूकमुळे त्यांनी एक वेगळ्या अंदाजाची झलक दाखवली आहे. “अज मैं मूड बणा लेया ए ए ए ,तेरे नाल ही नचणा वे” हे गाणे शुक्रवारी 6 जानेवारी 2023 रोजी टी सीरिजच्या अधिकृत युट्युब चॅनलवर रिलीज झाले आहे.

अमृता फडणवीस यांना तशी पाहिली तर गाण्याची फार आवड आहे. त्या नेहमी आपल्या गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. कधी त्यांची गाणी प्रेक्षकांना आवडतात. तर, कधी त्यांच्या गाण्यावर टीकाही होते. मात्र, त्यांनी त्यांच्या गाण्याची आवड कायम जपली आहे.