हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिंदे- फडणवीस सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंसोबत असलेले हिंगोलीचे आमदार संतोष बांगर हे बहुमत चाचणी पूर्वीच शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सोबत असलेल्या आमदारांची संख्या फक्त 15 राहिली आहे. तर शिंदे गटाकडे 40 आमदार आहेत.
एकीकडे मोठ्या प्रमाणात आमदारांनी बंडखोरी केल्यानंतरही संतोष बांगर हे उद्धव ठाकरे आणि मातोश्रीशी एकनिष्ठ राहिले होते. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात त्यांचा सत्कार करण्यात आला होता. येवडच नव्हे तर शिंदे गटात असलेल्या आमदारांवर त्यांनी विखारी टीका केली होती. तुम्ही पुन्हा पक्षात या, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तुम्हाला माफ करतील असे आवाहन करताना संतोष बांगर ढसाढसा रडले होते. तेच बांगर आज शिंदे गटात सामील झाल्यानं उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, शिंदे- फडणवीस सरकारला आज बहुमत चाचणी पार करावी लागेल. एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे गटनेते असतील अस विधानसभा अध्यक्षांनी सांगितल्या मुळे उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असेल.