Satara News : जावळीत गाैतमी पाटीलचा जलवा : आमदार शिवेंद्रराजे भोसलेही गाण्यावर थिरकले

Shivendraraje Bhosale also danced
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचा नुकताच कार्यक्रम पार पडला. गौतमीने पुन्हा नृत्य करत आपला जलवा सादर केला. जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा 30 मार्च रोजी वाढदिवस असल्याने त्यांच्या वाढदिवसा निमित्त गौतमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गौतमीच्या कार्यक्रमात आ. भोसले थिरकताना पहायला मिळाले. सध्या या कार्यक्रमाचे व्हिडिअो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

जावळी येथील गौतमीच्या कार्यक्रमास जावळी तालुक्यातील कुडाळ येथील कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले हे देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमा दरम्यान आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी कार्यकर्त्यांसह स्टेजवर हातवर करून थिरकलेले पाहायला मिळाले. या कार्यक्रमाला प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलचा साडी चोळी देऊन आमदार शिवेंद्रराजे यांनी सन्मान केला.

कार्यक्रमादरम्यान हुल्लडबाजी करणाऱ्या युवकांचा पोलिसांनी चांगला समाचार घेऊन सौम्य लाठीचार्ज देखील केला. यावेळी जावली माझी माऊली, जीची माझ्यावर प्रेमाची सावली. माझे सहकारी हीच माझी ताकद आहे. शेवटपर्यंत माझ्या जावली तालुक्यासाठी मी लढत, भांडत राहीन. परंतु आता तुमचा वेळ घेणार नाही, कारण तुमच्या सगळ्याचे लक्ष फक्त एकच सबसे कातील, गाैतमी पाटील एवढचं आहे. अशी डायलाॅगबाजी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली. आमदार शिवेंद्रराजे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधूनक गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.