मुंबई ते पालघर प्रवास आता सुलभ ! ‘उत्तन-विरार सागरी सेतू’ बदलणार वाहतुकीचा चेहरामोहरा

uttn virar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबईतील वाहतुकीच्या समस्येवर ऐतिहासिक तोडगा! दक्षिण मुंबईतून थेट पालघरपर्यंत जलद प्रवास शक्य होणार आहे. ‘उत्तन-विरार सागरी सेतू’ हा भव्य प्रकल्प मुंबईच्या वाहतुकीत क्रांतिकारी बदल घडवून आणणार आहे. अवघ्या 1 तासात नरिमन पॉइंटहून विरारपर्यंत पोहोचण्याचे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. 55.45 किलोमीटर लांबीच्या या सागरी महामार्गासाठी तब्बल 87,427 कोटींचा खर्च मंजूर करण्यात आला आहे. हा प्रकल्प केवळ मुंबईकरांसाठी नव्हे, तर गुजरात, दिल्लीसह देशभरातून येणाऱ्या वाहनांसाठी मोठी सोय ठरणार आहे.

उत्तन-विरार सागरी मार्ग कसा असेल?

  • प्रकल्पाची लांबी – 55.45 किमी
  • वेगवान प्रवास – अवघ्या 1 तासात दक्षिण मुंबई ते विरार
  • जोडणी – मुंबई-दिल्ली एक्सप्रेसवेपर्यंत थेट कनेक्शन
  • उभारणी – दोन टप्प्यांमध्ये मार्गनिर्मिती
  • प्रमुख कनेक्टर – विरार (18.95 किमी), वसई (2.5 किमी), उत्तन (10 किमी) प्रवासाचा वेग आता झपाट्याने वाढणार

मरिन ड्राईव्ह ते वरळी कोस्टल रोड, वांद्रे-वरळी सी लिंक, वांद्रे-वर्सोवा सी लिंक, आणि वर्सोवा-भाईंदर कोस्टल रोड नंतर उत्तन-विरार सागरी मार्ग हा वाहतुकीच्या साखळीत क्रांतिकारी टप्पा ठरणार आहे. यामुळे पालघर, ठाणे आणि मुंबई दरम्यानचा प्रवास आणखी वेगवान व सुकर होईल.

जायका (JICA) कडून आर्थिक सहाय्याचा प्रस्ताव

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जपानी वित्तीय संस्था JICA (Japan International Cooperation Agency) कडून निधी उभारण्याचा प्रयत्न केला जात आहे. केंद्र सरकारकडून या प्रस्तावास लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

मुंबईकरांसाठी सुवर्णसंधी

  • वाहतुकीला मोठा दिलासा – ट्रॅफिक जाम, लांबचा वळसा टाळता येणार
  • प्रवासाचा वेळ वाचणार – विरार ते नरिमन पॉईंट अवघ्या 1 तासात
  • आर्थिक आणि औद्योगिक विकासाला गती – पालघर जिल्ह्याचा विकास झपाट्याने होणार
  • मुंबई-दिल्ली एक्सप्रेसवे थेट जोडणार – देशभरातून मुंबईत प्रवेश सोपा