हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि मनसे मध्ये आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. याच दरम्यान मनसे सुपारी घेतल्याशिवाय कामच करु शकत नाही, त्यामुळे कोणाची तरी सुपारी त्ययांना घ्यावी लागेल, अशी टीका शिवसेनेचे नेते आणि मंत्री अनिल परब यांनी केली होती. अनिल परब यांच्या या टीकेवर मनसेने देखील प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही सुपारी घेणारे आहोत म्हणता, मग तुम्ही काय हप्ता घेणारे आहात का, असा सवाल बाळा नांदगावकर यांनी उपस्थित केला आहे
मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. आम्ही सुपारी घेणारे आहोत म्हणता, मग तुम्ही काय हप्ता घेणारे आहात का, असा सवाल बाळा नांदगावकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच अनिल परब आणि माझा प्रवास सारखाच झालेला आहे. त्यामुळे कोण काय करतं हे मला चागलं माहित आहे. जाऊन केबल वाल्यांना विचारुन घ्या, मग कळेल.” असं म्हणत बाळा नांदगावकर यांनी अनिल परब यांच्यावर टिकास्त्र सोडलं आहे. त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिका निवडणूकीत भाजपासोबत युती करायची की नाही, याचा अधिकार मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे घेतील असेही बाळा नांदगावकर यांनी म्हंटल आहे.
काय म्हणाले होते अनिल परब
अनिल परब म्हणाले होते की, मुंबई महापालिकेत बदलत्या राजकारणाची नांदी आहे की नाही हे माहिती नाही. मनसे सुपारी घेतल्याशिवाय कामच करू शकत नाही. त्यामुळे कोणाची तरी सुपारी त्यांना घ्यावी लागेल. मनसेचं अस्तित्व सुपारीवर चालू आहे.आतापर्यंत विविध पक्षांची सुपारी मनसेने घेतली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’