राज ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना परळी न्यायालयाकडून २ जानेवारी रोजी समन्स बजावण्यात आले होते. समन्स बजावण्यात आल्यानंतर न्यायालयात हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले होते. मात्र, ठाकरे हजर राहिले नसल्याने परळी न्यायालयाने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. ठाकरे यांच्यावर चिथावणी दिल्याचा आरोप करण्यात असून वॉरंट रद्द करण्यासाठी राज ठाकरे हे आज परळी कोर्टात राहणार कि नाही? त्यांचे वकील कोर्टात काय युक्तिवाद करणार? हे पहावे लागणार आहे.

राज ठाकरेंना 22 आॅक्टाेबर 2008 राेजी अटक झाली होती. त्याचा निषेध नाेंदवत परळीतील पदाधिकाऱ्यांनी परळी-गंगाखेड रोडवरील धर्मापुरी फाटा येथे एसटीवर दगडफेक केली हाेती. दरम्यान, न्यायालयाने राज ठाकरेंना 12 जानेवारी रोजी हजर राहण्याचे समन्सद्वारे सांगितले होते. पण ते कोर्टात हजर राहिले नाहीत. पोलिसांनी या प्रकरणी दोषारोप पत्रही कोर्टात सादर केले आहे. मात्र, राज ठाकरे प्रत्येक तारखेला गैरहजर राहिल्याने अखेर त्यांच्याविरोधात कोर्टाने अटक वॉरंट जारी केले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना परळी न्यायालयाकडून समन्स; नेमकं प्रकरण काय?

आता राज ठाकरे अटक वॉरंट रद्द करण्यासाठी आज सकाळी 11 वाजता परळी कोर्टात हजर राहणार आहेत. दरम्यान, राज ठाकरे आज सकाळी 10 वाजता पांगरी येथील गोपीनाथ गडावर जाणार असून त्यानंतर सकाळी 11 वाजता न्यायालयात ते हजर राहतील.