मुख्यमंत्र्यांना पाठवलेला माफीनामा इंग्रजीत तर मनसेला पाठवलेला माफीनामा मराठीत , खरं सरकार कुठे आहे ते कलर्सला पण माहीत आहे ; मनसेचा शिवसेनेला टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कलर्स मराठी वरील बिग बॉस मध्ये जान कुमार सानू यानं मराठी भाषेबद्दल आक्षेपार्ह शब्द उच्चारल्याने कलर्स वाहीनीला माफीनामा लिहावा लागलाय. जान सानू यानं देखील बिग बॉससमोर स्वत: च्या कृत्याची माफी मागितली आहे. ही क्लीप वायरल झाल्यानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेत कलर्सने २४ तासात माफी न मागितल्यास प्रक्षेपण बंद पाडू असा इशारा दिला होता. त्यानंतर कलर्स वाहिनीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आपला माफीनामा पाठवला पण या दोन्ही माफीनाम्यात भाषेचा फरक होता. मुख्यमंत्र्यांना पाठवलेला माफीनामा कलर्सने इंग्रजीत तर मनसेला पाठवलेला माफीनामा मराठी भाषेत लिहीला होता. यावरुन मनसेने राज्य सरकारवर निशाणा साधलाय.

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या इंग्रजी माफीनाम्यावरुन खोपकरांनी शिवसेनेला टोला लगावलाआहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना इंग्रजीत पत्र आणि राजसाहेबांना मराठीत ‘मनसे माफीनामा’ असं ट्वीट त्यांनी केलंय. खरं सरकार कुठे आहे हे कलर्सवाल्यांना पण माहिती असल्याचा टोला खोपकरांनी ट्वीटरच्या माध्यमातून लगावलाय.

बिग बॉस शोमध्ये जान कुमार सानु याने मराठी भाषेचा अपमान केल्याप्रकरणी आज राज्यभरात तीव्र पडसाद उमटले होते. मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी 24 तासांच्या आत माफी मागण्याची मागणी केली होती. अन्यथा चित्रिकरण बंद पाडण्याची धमकी दिली होती. यानंतर कलर्स या मनोरंजन वाहिनीने माफीनामा दिलाय.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment