हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या संबोधनातून त्यांनी कोरोनाची दुसरी लाट, कार्तिकी वारी, पोस्ट कोव्हिडचे परिणाम यांसह अनेक विषयांवर मते मांडली. मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर मनसेने जोरदार टीकास्त्र सोडलंय. बेरोजगारी, वीज बिलावर मुख्यमंत्री बोलतील असं वाटलं होतं मात्र तसं काहीच झालं नाही, अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली.
मुख्यमंत्र्यांकडून काही अपेक्षा नसल्याने कालच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणाने अपेक्षाभंग झाला नाही. आपला मुख्यमंत्री, आपले नशीब, आपले दुर्दैव, आपली जबाबदारी’, असं ट्विट मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केलं आहे.
मुख्यमंत्र्यांकडून काही अपेक्षा नसल्याने कालच्या मुख्यमंत्र्याच्या भाषणाने अपेक्षाभंग झाला नाही. आपला मुख्यमंत्री, आपले नशीब, आपले दुर्दैव, आपली जबाबदारी
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) November 23, 2020
आपला मुख्यमंत्री आपले दुर्दैव असून ती आता आपलीच जबाबदारी असल्याचं सांगत देशपांडे यांनी घणाघात केला आहे. वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरुन गेल्या काही दिवसांपासून मनेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याबाबत मुख्यमंत्री काहीतरी बोलतील अशी अपेक्षा होती. पण अजूनही वाढीव वीजबिलाचा मुद्दा ऐरणीवर आहे, असंही काल संदीप देशपांडे यांनी म्हटलं होतं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’