शिवसेनेचं लग्न एकाशी आणि लफडं दुसऱ्याबरोबर ; मनसेची जळजळीत टीका

0
36
raj and uddhav thackarey
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सुपारीबाज पक्ष असल्याची जहरी टीका शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी केली होती. त्यावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘शिवसेनेचं लग्न एकाशी आणि लफडं दुसऱ्याबरोबर’ असल्याची जळजळीत टीका देशपांडे यांनी केली आहे. मनसेनं जे केलं ते उघडपणे केलं. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतरची शिवसेना ही धोकेबाज सेना झाल्याचा आरोपही संदीप देशपांडे यांनी केला आहे.

शिवसेनेनं हिंदुंच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना स्वबळावर सत्ता आणणार असं सांगितलं होतं. पण आता राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्तेत बसले आहेत, अशा शब्दात देशपांडे यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. शिवसेनेचा जीव महापालिका रुपी पोपटामध्ये अडकला आहे. आज ‘कृष्णकुंज’चं महत्व वाढल्यामुळेच शिवसेनेच्या पोटात दुखत आहे”, अशी खोचक टीका देशपांडे यांनी केली आहे.

नक्की काय म्हणाले होते अनिल परब ?

“सुपारी घेतल्याशिवाय मनसे कोणतंही काम करू शकत नाही. त्यावरच त्यांचं अस्तित्व अवलंबून आहे, अशा शब्दात अनिल परब यांनी मनसेवर टीका केली आहे. ज्या भाजप नेत्यांना लोकसभा नुवडणुकीत ‘लाव रे तो व्हडिओ’ दाखवून उघडं नागडं केलं. त्यांच्यासोबतच उघडे झोपले की काय परिस्थिती होते ते पुढे दिसेल”, असा हल्लाबोल अनिल परब यांनी केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here