मुख्यमंत्री साहेब सरकार इतकं निर्दयी कसं झालं ? मनसेकडून उद्धव ठाकरेंना अनोख्या शुभेच्छा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात वाढीव वीजबिलाचा प्रश्न अद्याप मिटला नसून राज्यातील विरोधी पक्ष भाजप आणि मनसेने सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देताना वाढीव वीज बिलाचं काय झालं?, असा सवाल मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना यांना केला आहे. या आशयाचे एक बॅनरही मनसेने मातोश्रीबाहेर लावले आहे. या बॅनरमधून मनसेने उद्धव ठाकरेंना नववर्षाच्या शुभेच्छा देत, त्यांना वीजबिलाच्या आश्वासनाचीही आठवण करुन दिली आहे

मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्री महोदय गोड बोलता बोलता नवीन वर्ष आलं. गोड बातमी तर राहिली दूर पण जनतेचे हालचं हाल झाले. जनतेच्या खिशात पैसा नाही तरी वीज बिल भरा, ऊर्जा मंत्री म्हणाले. मुख्यमंत्री साहेब सरकार इतकं निर्दयी कसं झालं…?” असा सवाल मनसेने या बॅनरमधून विचारला आहे.

दरम्यान, यापूर्वीही मनसेने दादर आणि माहीम परिसरात होर्डिंगबाजी करून राज्य सरकारविरोधात वातावरण निर्मिती केली होती. ‘माझे लाईट बिल, माझी जबाबदारी’, आणि ‘तीन तिघाडा, लाईट बिघाडा’, अशा घोषणा या होर्डिंगवर लिहून सरकारवर निशाणा साधण्यात आला होता. शिवाय सोमवारी भेटूच, शॉकसाठी तयार राहा, असा इशाराही मनसेने उद्धव ठाकरेंना दिला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment