पाण्याच्या प्रश्नाला घेऊन मनसे पुन्हा आक्रमक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून खुर्चीत बसल्याने आपले हिंदुत्व विसरली आहे. व आता हे ध्वज दिवाळी असे काही केविलवाणे प्रयत्न करून आम्ही हिंदू आहोत असा आव आणण्याचा हे लोक प्रयत्न करत आहे. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना मुबलक पाणी मिळायला हवे होते मात्र सत्ताधारी शहरात ध्वज लावण्यात व्यस्त आहेत. 50 हजार भगवे ध्वज लावून नागरिकांच्या नळाला पाणी येणार नाही. असा उपरोधिक टोला मनसेने शिवसेनेला लगावला आहे.

शहरातील सिडको-हडको भागात मोठ्या संख्येने नागरिक राहतात. मध्यमवर्गीय, कामगार कुटूंब या भागात अनेक वर्षापासून राहत आहेत. मात्र अजूनपर्यंत त्यांच्या मुलभूत समस्या सुटलेल्या नाही. विशेषतः आठवड्यातून 8-10 दिवसातून एकदा पाणी मिळते. अनेक वर्षापासून सत्ताधारी पक्ष या सर्व भागात पाणी देऊ, रस्ते देऊ या आश्वासनांवर निवडणुका जिंकून आपापली गरज भागवत आली आहेत. परंतु मुळात या भागातील रहिवाशांसाठी एका सत्ताधारी नेत्याने सुद्धा विशेष लक्ष देऊन या नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न देखील केला नाही. या पार्श्‍वभूमीवर मनसेद्वारे सिडको-हडकोच्या पाणी प्रश्नावर हल्ला बोल आंदोलन करण्यात आले. दिवाळीच्या तोंडावर या नागरिकांना अनेक दिवसांपासून मुबलक पाणीपुरवठा नाही. जायकवाडी मधील तांत्रिक अडचणींमुळे तर कधी पाईपलाईन व्हॉल्व यांच्या नुकसानीमुळे. या भागात 2 मोठे जलकुंभ असूनही या भागातील पाण्याची समस्या अजूनही सुटली नाही. कारण या जलकुंभाचा मुख्य वापर हा टँकर माफीयांचा खिसा भरण्यासाठी होतो. हे सर्व टँकर माफीया सत्ताधारी पक्षाशी जोडलेले आहेत. असा स्पष्ट आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे.

मनपा प्रशासन जर वेळीच नागरिकांची पाण्याची समस्या सोडवणार नसेल तर दिवाळी नंतर लगेचच मनसे पाणी प्रश्नावर रान उठवल्याशिवाय शांत बसणार नाही. असा इशारा मनसेने दिला आहे. हिंदू सणांमध्ये नागरिकांना हक्काचे पाणी देऊ शकत नसाल तर आपला या खुर्चीवर बसण्याचा काही अधिकार नाही. तरी याची दखल घेऊन आपण हा पाणीप्रश्न त्वरित सोडवाला अन्यथा मनसे प्रशासकांना त्यांच्या घरी जावून जाब विचारेल. असा थेट इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे, सतनाम सिंग गुलाटी, प्रकाश महाजन, सुमित खांबेकर यांनी मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडेय यांना देखील दिला आहे.

Leave a Comment