आठवड्यातून एकदा रडणे तुमच्यासाठी का महत्त्वाचे आहे जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । आठवड्यातून एकदा तरी रडणे खूप महत्वाचे आहे. कारण ते आपल्याला तणावमुक्त करते. असे जपानमधील एका अकादमीचे म्हणणे आहे. तिथला एक शिक्षक स्वतःला ‘टीयर्स टीचर’ म्हणवतो. हायस्कूलचा माजी शिक्षक हिडेफुमी योशिदा संपूर्ण जपानमध्ये नियमित कार्यशाळा घेतात. ज्यामध्ये ते लोकांना रडण्याच्या मानसिक फायद्यांची ओळख करून देतात.

अश्रू डोळ्यांना कोरडे होण्यापासून वाचवतात. त्याद्वारे डोळे जंतूमुक्त राहण्यासही मदत होते. अश्रू म्हणजे पाणी आणि मीठ यापासून बनलेला द्रव पदार्थ. हॉलंडचे मानसशास्त्रज्ञ एड विंगरहोट्स यांना त्यांच्या संशोधनात असे आढळले की, प्लंबिंग सिस्टम अश्रू बनवते. जेव्हा आपण रडतो तेव्हा अश्रूंचे उत्पादन सुरू होते. डोळ्यांच्या खाली लॅक्रिमल सिस्टीम असते. हे अश्रू उत्सर्जन सिस्टीम तयार करते. रडताना डोळ्यांतुन तीन प्रकारचे अश्रू येतात.

reflex tears- हे अश्रू डोळ्यांतील कचरा साफ करतात. धूळ किंवा धूर काढून टाकण्याचे काम करतात.

continuous tears – हे अश्रू डोळ्यांमध्ये ओलावा कायम ठेवतात, ज्यामुळे डोळ्यांना कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून संरक्षण मिळते. या अश्रूंमध्ये 98 टक्के पाणी असते.

emotional tears – भावनिक अश्रूंमध्ये मुख्यतः स्ट्रेस हार्मोन आणि उर्वरित टॉक्सिंक्स असतात. संशोधकांचे म्हणणे आहे की, रडणे आपल्या आतील सर्व गोष्टी बाहेर काढण्यासाठी उपयुक्त आहे. असे म्हणता येईल की, शरीरातील स्ट्रेस हार्मोन बाहेर काढण्यासाठी रडणे हा एक चांगला मार्ग आहे.

टेस्टोस्टेरॉन हार्मोनचा देखील रडण्याशी जवळचा संबंध आहे. रडल्यानंतर लोकांना बरे वाटते. जगातील सर्वात कमी रडणाऱ्या महिला आइसलँड आणि रोमानियातील आहेत तर पुरुष बल्गेरियातील आहेत.

अश्रूंमध्ये लाइसोझाइम लिक्विड असते. हे केवळ 5 ते 10 मिनिटांत 90 ते 95 टक्के जंतू नष्ट करते. शरीरात तयार होणारी विषारी रसायने अश्रूंमधून बाहेर पडतात. रडण्याने शरीरातील मॅंगनीजची पातळी कमी होते, ज्यामुळे मूड चांगला राहतो. या घटकाच्या वाढीमुळे, एखाद्याला चिंताग्रस्त, थकवा, राग येतो. खूप कमी किंवा कमी रडणे हे मानसिक तणावाचे एक कारण असू शकते.

रडणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे. जन्माच्या वेळी, बाळाला रडवण्याचा प्रयत्न केला जातो जेणेकरुन त्याचे स्नायू आणि फुफ्फुस योग्यरित्या काम करतील.

आत्मशांतीसाठी रडणे ही सर्वोत्तम क्रिया आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की, हे पॅरासिम्पेथेटिक मज्जासंस्था (PNS) ऍक्टिव्ह करते. PNS body rest आणि digestion करण्यास मदत करते. त्याचे फायदे लगेच दिसत नाहीत. सुमारे दीड तास रडल्यानंतर तुम्हाला आराम वाटेल. जर तुम्ही बराच वेळ जागे असाल तर तुम्हाला झोप देखील येऊ शकते.

Leave a Comment