हे असे ‘व्हायरस’ वेळीच ठेचायला हवेत; मनसे नेत्याची जलील यांच्यावर जहरी टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : ३१ मार्च पासून जाहीर करण्यात आलेले लॉक डाऊन अचानक स्थगित करण्यात आल्यामुळे एमआयएम चे खासदार इम्तियाज जलील यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी करत जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांना पुष्पहार घालून रस्त्यावर मिरवणूक सुद्धा काढली होती. याच पार्श्वभूमीवर मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी जलील यांच्यावर जहरी टीका केली आहे. ‘हा प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार’ असं म्हणत अमेय खोपकर यांनी जलील यांच्यावर निशाणा साधला आहे.

एमआयएम च्या नेत्यांनी लाज गुंडाळून डोक्याला बांधली आहे का? संभाजीनगरमध्ये लॉकडाऊन स्थगित झाला म्हणून इम्तियाज जलील आणि त्यांच्या पक्षाने मोठा जल्लोष केला. संभाजीनगरमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे, परिस्थिती गंभीर असताना जल्लोष करुन नाचताना शरम वाटायला पाहिजे” असं अमेय खोपकरांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. अमेय खोपकर पुढे म्हणाले की, हा प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे. हे असे ‘व्हायरस’ वेळीच ठेचायला हवेत . कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्या या असल्या स्टंटबाज नेत्यांवर कडक कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे” अशी मागणीही अमेय खोपकर यांनी केली आहे.

दरम्यान, आधी औरंगाबादमध्ये ३० मार्च ते ८ एप्रिल दरम्यान लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर त्यात काहीसा बदल करून ३१ मार्च ते ९ एप्रिल दरम्यान लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. उद्यापासून लॉकडाऊन सुरू होणार असल्यानं गेल्या २ दिवसांपासून बाजारात खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली होती. मात्र आज जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांसह पत्रकार परिषद घेत लॉकडाऊन रद्द केल्याची घोषणा केली. औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर या निर्णयाला विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून मोठा विरोध केला होता. इम्तियाज जलील यांनी लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे . औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्याच्या निर्णयाविरोधात इम्तियाज जलील यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. ३१ मार्चला लॉकडाऊनच्या निर्णयाविरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा जलील यांनी केली होती.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment