हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या लाचखोरीच्या प्रमाण वाढले आहे. अशात मुंबईत काही नगरसेवकांकडूनच लाच घेतली जात असल्याचा प्रकार घडत आहे. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या प्रकरणाचा लवकरच पर्दाफाश करणार असल्याचा इशारा ट्विटकरून दिला आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यात एका नगरसेवकाच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्याचे त्यांनी सांगितले आहे. ट्विटमध्ये देशपांडे यांनी म्हंटले आहे की, “वीरप्पन गँगचा अजून एक कारनामा. भ्रष्टाचार करणारे अनेक नगरसेवक तुम्ही पाहिले असतील. पण भ्रष्टाचाराचे पैसे चेकने घेणारे नगरसेवक तुम्ही पाहिले नसतील. लवकरच मनसे त्यांचा पुराव्यासकट पर्दाफाश करणार आहे.”
विरप्पन गॅंग चा अजून एक कारनामा pic.twitter.com/52W3sbM79O
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) November 7, 2021
मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सर्वच प्रमुख राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. भाजपा, शिवसेना, मनसे या तिन्ही पक्षासोबतच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांकडून देखील पालिका निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी केली जात आहे. अशात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट केल्यामुळे खळबळ उडाली आहे.