‘मातोश्रीचं पूर्वीचं वजन संपलं, याला पूर्णपणे उद्धव ठाकरे जबाबदार’ मनसेची खोचक टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज मुंबईत आल्या होत्या. राष्ट्रपतीपदाचे उमेदवार मुंबईत आले तर शिवसेना प्रमुखांच्या मातोश्री या निवासस्थानी भेट घेतात, अशी एक राजकीय पंरपरा मानली जात होती. मात्र आज तसे काही घडले नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तरीदेखील द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) या मातोश्रीवर आल्या नाहीत. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. याच गोष्टीवरून मनसेचे नेते यशवंत किल्लेदार (Yashwant Killedar) यांनी ट्विटरवरुन उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे.

काय म्हणाले यशवंत किल्लेदार ?
“राष्ट्रपती पदाचे उमेदवार मुंबईत आले की पाठिंब्यासाठी मातोश्रीवर जरूर जातात. पण यावेळेस आताचे उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) या मुंबईत येऊन देखील मातोश्रीवर का गेल्या नाहीत? मातोश्रीचे पूर्वीचे वजन संपलं आणि याला सर्वस्वी उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. आजच्या शिवसैनिकांनी अभिमान बाळगायला हवा”, अशी टीका यशवंत किल्लेदार (Yashwant Killedar) यांनी केली आहे.

या अगोदर शिवसेनेने राष्ट्रपती निवडणुकीत प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रपती निवडणुकीच्या वेळी प्रणव मुखर्जी जेव्हा मुंबईत आले होते तेव्हा त्यांनी मातोश्रीवर जावून शिवसेना प्रमुखांची भेट घेतली होती. मात्र यावेळी असे काहीच घडले नाही. यावेळच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी मातोश्रीवर जाणं टाळलं.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर

Leave a Comment