हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठीच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबई आणि पुण्यात खळखट्याकचा सपाटा लावल्यानंतर अॅमेझॉन बॅकफूटवर गेलं आहे. पुढील सात दिवसात अॅमेझॉनने आपल्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर मराठी भाषेचा समावेश करण्याचं आश्वासन दिलं असल्याची माहिती मनसे नेते अखिल चित्रे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.
मराठी भाषेचा वापर करण्यासाठी सात दिवसांची कालावधी द्यावा अशी विनंती केली आहे. महाराष्ट्रात व्यापार करताना ‘मराठीचा अंतर्भाव करायला आम्ही बांधिल नाही’ अशी मुजोरीची भाषा अॅमेझॉनने वापरली होती. तसेच राजसाहेब ठाकरे ह्यांच्यावर खटला भरण्याची धमकी देण्य़ात आली होती. आता मनसेने अॅमेझॉनला राज ठाकरेंची माफी मागण्याची मागणी केली आहे. मनसेने मुंबई, पुणे, वसई अशी तीन कार्यालये फोडली आहेत.
तत्पुर्वी, याप्रकरणात ॲमेझॉनने महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावली होती. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी ॲमेझॉनच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. अखेर मनसेच्या दणक्यापुढे अॅमेझॉनला नमते घ्यावेच लागले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’