हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतेच एक विधान केल्यामुळे त्यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्यावतीने टीका करण्यात आली आहे. राज ठाकरेंनी महाराष्ट्रात अलीकडच्या काळात जातींमधील संघर्ष वाढायला लागल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्यावर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी टीका केली आहे. राज ठाकरे यांना बाबासाहेब पुरंदरे यांच्यापलीकडे इतिहासाचे आकलन नाही, अशी टीका संभाजी ब्रिगेकडून करण्यात आली आहे.
एका कार्यक्रमात राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. “राज्यात जाती अभिमान बाळगण्यापुरत्याच होत्या. पण गेल्या 20 वर्षापासून चित्र बदलले आहे. लोक जातीचा अभिमान बाळगण्याबरोबरच इतर जातींचा तिरस्कार करू लागले आहेत. जातीचा मुद्दा हा राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीचा मुद्दा सर्वार्थाने मोठा झाला असल्याचे ठाकरे यांनी म्हंटले आहे. त्यांच्या या आरोपाचा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी समाचार घेत. ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे.
https://www.facebook.com/pravingaikwadpage/posts/4543325889066781
यावेळी गायकवाड यांनी आपल्या फेसबुक अकाउंटद्वारे टीका करताना म्हंटले आहे की, “राज ठाकरे यांना पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही, तसेच त्यांना येथील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचेही आकलन नाही. राजकारणात कुठलेही नवनिर्माण करता न आलेला आणि राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला हा माणूस आहे,” अशी टीका यावेळी गायकवाड यांनी केली आहे.