मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोरोनाची लागण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज ठाकरे यांची तब्येत बिघडल्याने काल त्यांचे सर्व दौरे रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. राज ठाकरे यांना कोरोनाचे सौम्य लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आईला देखील कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर येत आहे. राज यांच्या निवासस्थानी कृष्णकुंज येथेच त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. तर घरातील इतर सदस्य क्वारंटाईन झाले आहेत.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मध्यंतरीच्या काळात पक्षबांधणी मजबूत करण्यासाठी त्यांनी दौरेही सुरू केले होते. राज ठाकरे हे मुंबईतील भांडुप येथे आज म्हणजेच आणि उद्या पुण्यात मेळावा घेणार होते. मात्र त्यांची तब्बेत बिघडल्याने त्यांनी दोन्ही मेळावे रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. गुरु माँ साध्वी कांचन गिरी यांनी काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली होती. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांना अयोध्येला येण्याचं निमंत्रणही दिलं आहे.