हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसेच्या पुणे शहराध्यक्ष पदावरून वसंत मोरे यांची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर पुणे मनसेत गळती सुरू झाली आहे. पुण्याचे मनसे शहर उपाध्यक्ष सय्यद अझरुद्दीन यांच्यासह 4 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्याच्या सत्रानंतर मनसेत नेमकं चाललंय तरी काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अझरुद्दीन सय्यद यांनी मनसेचे नवे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांना पात्र लिहीत आपला राजीनामा दिला. या पत्रात ते म्हणतात की, अत्यंत दुःखी आणि निराश मनाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आज शेवटचा ‘जय महाराष्ट्र’ करत आहे. मी ज्या समाजातून येतो त्या समाजाबद्दल चुकीची भूमीका घेऊन त्याच पक्षाच्या पक्षाध्यक्षांनी मला पक्ष सोडायला भाग पाडले त्या पक्षाध्यक्षांचे आभार, असा टोला सय्यद यांनी लगावला आहे.
वसंत मोरेंचे काय चुकले असा सवालही सय्यद यांनी या पत्रात उपस्थित केला आहे. वसंत मोरे याना फक्त लोकप्रतिनिधी म्हणून जी भावना व्यक्त केली तरी काय वागणूक मिळाली हे आज उभ्या महाराष्ट्राने पाहिले. त्यांना ही वागणूक मिळाली तिथे इतर लोकांचे काय ? असा सवाल करत पक्ष स्थापन झाल्यापासून आत्ताच जर पाडव्याच्या दिवशी मशिदीच्या भोंग्यांचा आणि मदरशाचा त्रास होत असेल तर नक्कीच काहीतरी चुकीचे होते आहे असेही सय्यद अझरुद्दीन यांनी पात्रात म्हटले आहे.