ग्लोबल टीचर पुरस्कार जिंकणाऱ्या मराठमोळ्या शिक्षकाचं राज ठाकरेंकडून ‘मनसे’ कौतुक, म्हणाले की…

0
52
Raj Thackray
Raj Thackray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सोलापूरच्या परितेवाडी शाळेतले शिक्षक रणजीतसिंह डिसले यांनी युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार त्यांनी पटकावला. सात कोटी रुपयांचा हा पुरस्कार मिळवणारे रणजीतसिंह डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरले आहेत. त्यांच्या या कारनाम्यामुळे भारतच नाव जगात उंचावले. QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्राच नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामांची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.

“युनेस्को आणि लंडनच्या वार्की फाऊंडेशनकडून दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ सोलापूर जिल्ह्यातील रणजितसिंह डिसले ह्यांना मिळाला. रणजितसिंह तुमचं मनापासून अभिनंदन! तमाम महाराष्ट्राला तुमचा अभिमान वाटतोय”, असं लिहित राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे डिसले यांचे कौतुक केले.

जगभरातील १४० देशातील १२ हजारांहून अधिक शिक्षकांच्या नामांकनामधून अंतिम विजेता म्हणून डिसले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पुरस्काराच्या एकूण रकमेपैकी ५० टक्के रक्कम अंतिम फेरीतील ९ शिक्षकांना देण्याचे रणजीतसिंह डिसले यांनी जाहीर केलं आहे. यामुळे ९ देशांमधल्या हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जाईल. रणजितसिंह डिसले यांना मिळालेली रक्कम टीचर इनोव्हेशन फंडाकरता वापरणार असून त्यामुळे शिक्षकांमधील नवनवीन प्रयोग करण्यास चालना मिळेल असंही त्यांनी म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here