BKC तर KBC होता, अभ्यासपूर्ण बोलायला…. ; मनसेची मुख्यमंत्र्यांवर टीका

shinde raj thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघानींनी दसरा मेळाव्या निमित्त भाषण केले. पण एकनाथ शिंदे यांनी वाचून केलेल्या भाषणावरून विरोधकांनी निशाणा साधला आहे. BKC तर KBC होता, असे म्हणत मनसे आमदार राजू पाटील यांनी शिंदेंच्या भाषणाची खिल्ली उडवली आहे.

राजू पाटील यांनी ट्विट करत म्हंटल, भाषणासाठी कोणाला कोणावरचा ‘राग’ लागतो, अभ्यासपूर्ण बोलायला राजसाहेबांसारखा ‘वाघ’ लागतो. राजसाहेब ते राजसाहेबच ! यावेळी त्यांनी #मजा_नाय_राव … #BKC_तर_KBC_होता असे हॅशटॅग वापरत मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

दरम्यान, एकनाथ शिंदे बीकेसी येथील मेळाव्यात लोकांची गर्दी जमवण्यात यशस्वी ठरले असले तरी दमदार भाषण करण्यात मात्र अपयशी ठरले. एकनाथ शिंदे हे बीकेसीवरील गर्दीसमोर तब्बल सव्वा ते दीड तास बोलले पण त्यांच्या भाषणात जोर दिसत नव्हता. लिहून आणलेल्या मुद्द्यांभोवतीच ते घुटमळत राहिलेले दिसले. शिंदे यांच्या भाषणात राम मंदीर, कलम ३७०, पीएफआयवरील बंदी असे भाजपचेच मुद्दे दिसले.