व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

‘या’ शहरांत आजपासून सुरु होणार Jio 5G नेटवर्क; तुमच्या शहराचा समावेश आहे का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – एअरटेलने सर्वात पहिली भारतात 5G सेवा केली होती. यानंतर आता जिओने (Jio) आपल्या कस्टमरसाठी 5G सेवा आणली आहे. काही वर्षांपूर्वी जिओने 4G सेवा सुरु करून धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता जिओचे (Jio) कस्टमर 5G सेवेची वाट बघत होते. आता लवकरच जिओ कस्टमरची प्रतीक्षा संपणार आहे.

रिलायन्स जिओने (Jio) जेव्हा टेलिकॉम क्षेत्रात पाऊल टाकले तेव्हा कंपनीकडे एक ग्राहक नव्हता. मात्र त्यानंतर काही महिन्यांतच रिलायन्सची सिमकार्ड घेण्यासाठी लोकांचा रांगा लागू लागल्या. एअरटेल, व्होडाफोन, आयडियाचे ग्राहक आपले सिम कार्ड जिओमध्ये पोर्ट करून घेऊ लागले. यानंतर रिलायन्स जिओचा स्वतःचा एक ग्राहकवर्ग तयार झाला आहे. त्यामुळे बाकी मोबाईल कंपन्यांचे मार्केट डाऊन झाले. यानंतर एअरटेलने मोठे पाऊल उचलत आठ शहरांत 5G सेवा सुरु केली. यामुळे जिओला (Jio) मोठा फटका बसण्याची शक्यता होती.

यानंतर जिओने आपल्या कस्टमरसाठी 5G सेवा सुरु करण्याचे जाहीर केले. येत्या दिवाळीपर्यंत जिओ (Jio) चार मोठ्या शहरांत आपली 5G सेवा सुरु करणार आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईचा समावेश आहे. यानंतर जिओ डिसेंबर 2023 पर्यंत सर्व तालुका, जिल्हा पातळीवर आपली सेवा पोहोचवणार आहे. रिलायन्सने परवडणाऱ्या किंमतीत 5जी सेवा सुरु केली जाईल असे जाहीर केले आहे. जिओने सध्या तरी आपल्या प्लॅन्सबाबत कोणतीही कल्पना दिलेली नाही.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती