हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी तौत्के चक्रीवादळामुळे हानी झालेल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला होता. मात्र या दौऱ्यावरून विरोधकांनी टीका करायला सुरूवात केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा वेग हा चक्रीवादळाला लाजवेल असा होता असा खोचक टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
संदीप देशपांडे यांनी ट्विट करत म्हंटल की, मुख्यमंत्री साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे, चक्री वादळाला लाजवेल असा तुमच्या दौऱ्याचा वेग होता. पुराणकाळात देवी देवता वगैरे मनोवेगाने फिरायचे तसे तुम्ही फिरलात. खरच BEST C M.
मुख्यमंत्री साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे, चक्री वादळाला लाजवेल असा तुमच्या दौऱ्याचा वेग होता. पुराणकाळात देवी देवता वगैरे मनोवेगाने फिरायचे तसे तुम्ही फिरलात. खरच BEST C M.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) May 22, 2021
राणेंनीही साधला निशाणा –
दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला होता. मुख्यमंत्र्यांनी विमानतळापासून मोजून 10 किलोमीटर अंतरावरील भागांची पाहणी केली. आतमध्ये जाऊन कुठल्याही गावाला भेट दिली नाही. ‘यालाच म्हणतात “lipstick” दौरा, अशी टीका नितेश राणे यांनी केली होती.