हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज्यभर मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानात स्वाक्षरी कार्यक्रम राबविण्यात येत आहे.या कार्यक्रमामुळे त्या ठिकाणी प्रचंड गर्दी जमेल आणि कदाचित कोरोना प्रसार होण्याची शक्यता देखील बळावेल म्हणुन मनसे नेत्यांना सीआरपीसी १४९ अंतर्गत नोटिस देखील पाठवण्यात आली आहे.
या नोटीसीच्या प्रश्नावर उत्तर देताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी खास आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे.देशपांडे म्हणाले की “मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम योग्य ती खबरदारी घेऊन पार पाडू. बेजबाबदारपणे वागायला आम्ही काय संजय राठोड नाही.
मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात स्वाक्षरी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येऊन सही केली.
राज्य सरकारने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्यामुळे मनसेचे नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
संजय राठोड यांनी काय बेजबाबदारपणा केला होता
वाशीम जिल्ह्यातल्या पोहरादेवी या मंदिरात वनमंत्री संजय राठोड यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमवत शक्ती प्रदर्शन केलं होतं.त्यामुळे गडावरील महंत आणि इतर १८ जणांना कोरोना ची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालंय.त्याच प्रकरणाला धरून संदीप देशपांडे यांनी हा टोला लगावला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’